Rt.Rev.Dr.P.L.Kamble
Chairman, Nasik Diocesan Council
About Us
रघुनाथ बाळकृष्ण केळकर (नाना) ए.एम. जेष्ठ चित्रकार व कला शिक्षक
● संस्थापक व माजी प्राचार्य - प्रगतकला महाविद्यालय, तारकपूर, अहमदनगर ● आद्य व्यंगचित्रकार / मर्म चित्रकार ० लेखक / बालकथा लेखक / वार्ताहर / उत्तम वक्ते / बहुभाषिक ● बासरीवादक / घरगुती औषधांचे प्रसारक र. बा. केळकर (नाना) सरांचा जन्म २२ मे १९०८ साली सिंदखेडे (प.खानदेश) येथे झाला. वडील फौजदार असल्याने सतत बदल्या होत असत. वडीलांकडून वयाच्या चौथ्या वर्षापासून गेरुने व धूळपाटीवर चित्रे काढण्याचे शिक्षण मिळाले. १९२४-२५ ते १९३२ पर्यंत साने गुरुजी व माधव ज्युलिअन हे उच्च दर्जाचे शिक्षक त्यांना लाभले. हे प्रखर संस्कार म्हणजेच नानांचे शैक्षणिक ज्ञान भांडवल. नानांचा चित्रकला व व्यंगचित्रांचा अभ्यास व सराव उपलब्ध असलेल्या नानाविध मासिके, पुस्तके व वर्तमानपत्रांच्या आधारे चालू होता. १९२५ साली इंटरमेजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत नानांना नेचर या विषयास बक्षीस प्राप्त झाले व तेव्हापासून त्यांच्या कला कारकिर्दीस प्रसिध्दी सुरु झाली. १९२९ साली मुंबई विद्यापिठाची मॅट्रिक उत्तीर्ण होऊन चित्रकला विषयात मुंबई इलाख्यात पहिला क्रमांक मिळविला. किर्लोस्कर मासिकाचा पहिला चित्रकार
म्हणून प्रसिध्दी मासिकांतून चित्रे व गोष्टी 'शाळापत्रक' मधून गोष्टी, १९२९ साली जिजामाता व छ.शिवाजी महाराज बुध्दीबळ खेळत असतानाचे पहिले तीन रंगी चित्र चित्रमय जगत मध्ये प्रसिध्द झाले.
नानांनी अनेक गाजलेल्या पुस्तकांसाठी चित्रे काढून वेगवेगळ्या विषयांवरील अभ्यास वृध्दींगत केला. १९३२ ला मुंबईला प्रयाण व महाराष्ट्र चित्रकार मंडळाच्या कार्यास मदत १९३४ ला 'नवाकाळ' चा व्यंगचित्रकार व कथाचित्रकार म्हणून नवी ओळख व त्याच वर्षी एकदम पुढील अॅडव्हान्स ड्रॉईंग व पेंटिंग या वर्गात प्रवेश मिळून मुंबई प्रातांत नानांनी पहिला क्रमांक मिळविला. नाना १९३५ मध्ये ड्रॉईंग टीचर्स परीक्षा पहिल्या वर्गात १ ल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अहमदनगर येथे अमेरिकन मिशनचे बॉईज हायस्कूल मध्ये ड्रॉईंग टीचर म्हणून १९३५ ते १९६६ सालापर्यंत सेवा करुन निवृत्त झाले.
१९४२ मध्ये संयुक्त खानदेश साहित्य संम्मेलनातील - साहित्य चित्रकला प्रदर्शन अधिवेशनाचे नाना अध्यक्ष होते. चित्रकलेत मराठीमध्ये उत्तम व प्रभावी, अभ्यासपूर्ण वास्तवाचे दर्शन घडवणारे चित्रकार लेखक खूप कमी मात्र र.बा. केळकरांचे विविध लेख अनेक कला विषयावर प्रकाश टाकणारे अभ्यासपूर्ण वाटतात.
नानांनी प्रगतकला केंद्र चालू केले. त्यामधून अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडवून उच्च परीक्षांना पाठविले. यामध्ये प्रत्येक जातीच्या, धर्माच्या लोकांना नानांनी घरातील सदस्याप्रमाणे वागवून चित्रकला शिकवली.
रोजच्या जीवनातले वास्तव कागदावर हव्या असलेल्या रंगातून मांडत असत. त्यांनी त्यांच्या पेंटिंग्जची बरीच प्रदर्शने केली. अनेक चित्र विद्यार्थ्यांनी नेली.
१९४३ मध्येच एक ब्रिटीश भारतवादी सैनिक क्लाईव्ह ब्रेन्सन नगरला आले जे उत्तम व्यक्ती होतेच व चित्रकारही होते. त्यांनी त्यांच्या ब्रिटीश सोल्जर इन इंडिया या पुस्तकात नानाबद्दल व नानांच्या विशिष्ट चित्रकलेबद्दल भरभरुन लिहिले आहे. आंतरराष्ट्रीय कितींचे प्रख्यात चित्रकार सैय्यद हैदर रझा, नागपूर येथे बापूराव आठवलेंकडे शिकण्यास असतांना र.बा. केळकर तिथे शिकवण्यास गेले. नानांच्या शैलीचा व विचारांचा प्रभाव रझांच्या मनावर झाला. रझा रझांनी प्रगतकलेला एक प्रात्यक्षीक चित्र करुन दाखविले आहे. नाना १९३७ मध्ये आर्ट मास्टरची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. नानांनी प्रगतकला सदस्याप्रमाणे वागवून चित्रकलाशिकविली.
नानांची चित्रे जीवंत, प्रभावी, सहज भावणारी व हृदयाला भिडणारी असत. आकाराने ती लहान परंतू अर्थाने महान-मोठी असत. अनेक चित्रे डेमो म्हणूनच काढून दाखविलेली असत. रोजच्या जीवनातले वास्तव कागदावर केली. अनेक चित्र विद्याथ्र्यांनी नेली. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला ५५ पेंटींग्ज व ऑध (सातारा) येथील श्री भवानी चित्र संग्रहालय/ग्रंथालय यांना १३४ चित्रे देणगी दाखल दिलेली आहेत.
अहमदनगर येथील जवळपासच्या खेड्यांमधील गोरगरीब मूलांना कलेचे उच्च शिक्षण व परीक्षेसाठी पुण्या-मुंबईलाच जाणे अगत्याचे होते. त्यामुळे १९६६ साली नाना निवृत्त झाल्यावर नानांनी पुण्यामुंबईच्या तोडीचे कलाशिक्षण अहमदनगर येथे देण्यासाठी कला महाविद्यालय काढण्याच्या हालचाली सुरु केल्या. बिशप अॉफ नासीक रा. रेव्ह. ल्युथर साहेब, सी.एम. हणबरहट्टी साहेब व र.बा. केळकर ह्या त्रिमूर्तीनी मिळून र.बा. केळकर प्राचार्य असलेल्या प्रगतला महाविद्यालयाची स्थापना १ ऑगस्ट १९६६ रोजी केली. नानांनी १९७३ पर्यंत प्रगतकला महाविद्यालयाला प्रगत करुन पुढील प्रगतीकडे वाटचाल करण्यास तयार करुन दिले. प्रगत कलेला प्राचार्य म्हणून द.गो. कांबळे, पी.के. चव्हाण, सुरेश लोंढे, घनश्याम घोडके, संजय काळे लाभले. नशीबाने प्रगतकला महाविद्यालयाची इमारत व प्रांगण खूप प्रशस्त आहे. अशाप्रकारे नानांनी आपले सर्वस्व प्रगतकला महाविद्यालयासाठी खर्चीं केले.प्रगत कला महाविद्यालयात आर्ट टिचर डिप्लोमा व मूलभूत अभ्यासक्रम कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई. यांच्या अंतर्गत चालविले जातात तसेच 2018 पासून महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग एक्झामिनेशन च्या अंतर्गत कंम्प्यूटर अॅनिमेशन हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम चालू झाला आहे तसेच फोटोग्राफी ह्या शासनाच्या एक वर्षाच्या अभ्यासक्रमालाही शासनाने मान्यता दिली आहे. व कमर्शिअल आर्ट (अॅप्लाइड) अभ्यासक्रमाला मान्यता मिळण्याच्या मार्गावर आहे
प्रगतकला महाविद्यालय नाशिक डायोसिसन कौन्सिल पी.टी.आर. डी. टू-नाशिक यांचे मार्फत चालविलेले असून हे अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव शासनमान्य व अनुदानित चित्रकला महाविद्यालय आहे. सध्या या संस्थेचे रा. रेव्ह. डॉ. प्रदिप कांबळे (बिशप अॉफ नासिक) अॅडव्टॉक चेअरमन आहेत. प्रभारी प्राचार्य म्हणून नूरील भोसले कार्यरत आहे. 01 आॅगस्ट 1966 सालापासून काही उल्लेखनीय काम करनार्या प्रगतकला महाविद्यालयाच्या कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांची या ठिकाणी नोंद घेणे गरजेचे वाटते.